Appreciable : वालूर, दारेवाडीच्या बारवांची मोहर पोस्टकार्डवर; सीपीएमजींनी मुंबईत केले जारी टपाल तिकिट

Appreciable : वालूर, दारेवाडीच्या बारवांची मोहर पोस्टकार्डवर; सीपीएमजींनी मुंबईत केले जारी टपाल तिकिट

Appreciable : वालूर, दारेवाडीच्या बारवांची मोहर पोस्टकार्डवर; सीपीएमजींनी मुंबईत केले जारी टपाल तिकिट

महाराष्ट्र  बारव पुनर्जीवन मोहिमेचेे संस्थापक रोहन काळे यांचा पाठपुरावा, पुरातत्व विभागाचा सक्रीय सहभाग

Appreciable : वालूर, दरेवाडीच्या बारवांची मोहर पोस्टकार्डवर; सीपीएमजींनी मुंबईत केले जारी टपाल

सेलू जि.परभणी : जागतिक वारसा दिनानिमित्त टपाल खात्याने जारी केलेल्या पोस्टकार्ड व आंतर्देशीय पत्रावर सेलू (जि‌.परभणी) तालुक्यातील वालूर येथील प्रसिद्ध ‘हेलीकल स्टेपवेल’ ची मुद्रा झळकली आहे. यानिमित्ताने टपाल खात्याकडून प्राचीन बारव स्थापत्याचे अंकन होण्याचा बहुमान जिल्ह्याला मिळाला आहे.
‘वर्ल्ड हेरिटेज डे ‘ निमित्त महाराष्ट्र सर्कलचे पोस्टल विभागाचे चीफ पोस्टमास्टर जनरल (सीपीएमजी) यांनी मंगळवारी, १८ एप्रिल रोजी परभणी जिल्ह्यातील वालूर येथील कुंडलाकार (हेलीकल स्टेपवेल) बारव व अहमदनगर जवळच असलेल्या दारेवाडी येथील हत्ती बारवाच्या छायाचित्रांचे तिकिट प्रकाशित केले आहे. वालूर येथील बारवेचा लाईन डायग्राम छत्रपती संभाजीनगर पुरातत्व विभागाचे समन्वयक मयुरेश खडके, तर हत्तीबारवेचा वेदिका शितरे यांनी तयार केलेला आहे. महाराष्ट्र बारव पुनर्जीवन मोहिमेचे संस्थापक तथा समन्वयक रोहन काळे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. वालूर येथील ग्रामस्थांनी वर्षभरापूर्वी श्रमदानातून बारव पुनर्जिवीत केलेली आहे. कुंडलाकार आकाराच्या या बारवेचे स्थापत्य आगळे वेगळे असल्यामुळे ती कायम चर्चेत आहे. अनेक स्थापत्य व इतिहास प्रेमींनी वालूर येथे भेट देऊन पाहणी केली. दिवाळी, महाशिवरात्रीनिमित्त ग्रामस्थ या ठिकाणी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. वालूरला मिळालेल्या बहुमानाबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Appreciable : वालूर, दरेवाडीच्या बारवांची मोहर पोस्टकार्डवर; सीपीएमजींनी मुंबईत केले जारी टपाल

गतवर्षी मार्च महिन्यात झालेल्या ‘मन की बात’ मध्ये महाराष्ट्रातील बारव मोहिमेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून दखल घेतली होती. या पार्श्वभूमीवर ‘मन की बात’ च्या शंभराव्या भागानिमित्ताने २६ व २७ एप्रिल रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमासाठी निमंत्रण आले आहे. वालूर व दारेवाडी येथील बारवांची मोहर तिकिटांच्या रुपात ‘सीपीएमजी’ यांनी प्रकाशित केल्याबद्दल आभार. यामुळे महाराष्ट्रातील बारव पुनर्जीवन व जतन मोहीमेला निश्चितच बळ मिळाले आहे.

– रोहन काळे, संस्थापक, महाराष्ट्र बारव पुनर्जीवन व जतन मोहिम, मुंबई


हेही वाचा : सोळाव्या शतकातली बारव लखलखली

हेही वाचा : वालूरच्या पुष्करणीला श्रमदानातून पुनर्जीवन

हेही वाचा : रायपूरची ऐतिहासिक बारव पुन्हा लख्खं !

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!