Meri Mati Mera Desh : ‘भारत माता की जय’च्या जयघोषात स्वातंत्र्य सैनिक सन्मान रॅली; सेलूूतील हुतात्मा स्मारक परिसरात फुलले चैतन्य

मराठवाडा मुक्तीसंग्रामात सर्वसामान्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण : डॉ.बी.जी.कुलकर्णी

Meri Mati Mera Desh : ‘भारत माता की जय’च्या जयघोषात स्वातंत्र्य सैनिक सन्मान रॅली; सेलूूतील हुतात्मा स्मारक परिसरात फुलले चैतन्य

Meri Mati Mera Desh : 'भारत माता की जय'च्या जयघोषात स्वातंत्र्य सैनिक सन्मान रॅली; सेलूूतील हुतात्मा स्मारक परिसरात फुलले चैतन्य

सेलू नगरपालिकेचा पुढाकार, सेलूतील स्वातंत्र्य सैनिक, कुटुंबियांसह माजी सैनिकांचा सन्मान

सेलू जि.परभणी, दि.१४ : ‘मेरी माँटी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत सेलू (जि.परभणी) नगरपालिकेच्या वतीने सोमवारी (१४ ऑगस्ट) स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक सन्मान रॅली उत्साहात काढण्यात आली. रॅलीमध्ये अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय, माजी सैनिक, शालेय विद्यार्थी, पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. हुतात्मा स्मारक परिसरात सन्मान सोहळा झाला. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी होते. स्वातंत्र्य सैनिक भगीरथ गेना, तहसीलदार दिनेश झांपले, पोलिस निरीक्षक समाधान चवरे, मुख्याधिकारी देविदास जाधव, कॅप्टन जे.पी.शर्मा, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक भगीरथ गेना यांच्यासह ४२ स्वातंत्र्य सैनिकांच्या उत्तराधिकार्‍यांचा, ३१ माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचा सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सूतहार व सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांच्या नामशिलाफलकाचे तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा व्हीजन २०४७ चा संदेश शिलाफलकाचे अनावरण झाले.‌या वेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्रभाकर सुरवसे, ॲड.विजय खारकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, बंडू तिवारी, सतीश कुलकर्णी, ॲड.श्रीकांत वाईकर, अशोक कासार, अशोक फोफसे, बाबासाहेब चारठाणकर आदींची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ.गंगाधर गळगे यांनी पंचप्रण शपथ दिली. सच्चिदानंद डाखोरे, पूजा महाजन व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायीले. ॲड.श्रीकांत वाईकर, दिगंबरराव कदम यांनी मनोगत व्यक्त केले. शैलेश लाहोटी यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रास्ताविक देविदास जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. यशवंतराव चारठाणकर, ए.डी.कुलकर्णी, कॅप्टन मनोहर कलालडे, रमेश शिकारे, राजेंद्र नावाडे, विलास फोफसे, मिलिंद सावंत, डॉ.राजेंद्र मुळावेकर, श्याम आढे, गौतम सूर्यवंशी, वसंतराव ढेकळे, रवि मुळावेकर, किशोर ढोके, राजेंद्र पवार, गणेश माळवे आदींसह स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, माजी सैनिक, पालिका कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक भगीरथ गेना यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय तसेच माजी सैनिक कॅप्टन जे.पी.शर्मा, रमेश काकडे, सुरेश रोडगे, विठ्ठलसिंग ठाकूर रघुवंशी, विठ्ठलराव शिंदे, गंगाधर राऊत, भुजंगराव कदम, प्रकाश देऊळगावकर, कॅप्टन मनोहर कलालडे,ज्ञानेश्वर कावळे, सदाशिव पौळ, एस.एम.पवार, पुरण पुरभे, संतोष जाधव, अनिल गौंडगे, अशोक वायाळ, लक्ष्मणराव कनकुटे, संजय नाईकनवरे, विजय देशमाने, आर.एफ.जाधव, भगीरथ गायकवाड, पद्माकर कुलकर्णी, मारोती भिसे, यशवंतराव सावंत, माणिकराव मस्के, रमेशराव इघवे, भगवानराव भराटे, श्रीमती गात, श्रीमती राठोड, श्रीमती शिंदे, श्रीमती पवार आदींचा सन्मान करण्यात आला.


छायाचित्र सहकार्य : शंभु काकडे, सेलू


Saibaba Bank : कष्टकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध : हेमंतराव आडळकर; सेलूतील साईबाबा बँकेची वार्षिक सभा उत्साहात

स्वातंत्र्य दिन : परभणीचे कृष्णा भोसले यांना दिल्लीचे आमंत्रण; लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणासाठी उपस्थित राहणार

https://sakashnews.com/?p=6840

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!