सानेगुरुजी : जयंतीनिमित्त नूतन कन्या शाळेत कार्यक्रम

सानेगुरुजी : जयंतीनिमित्त नूतन कन्या शाळेत कार्यक्रम

सानेगुरुजी हे थोर प्रतिभावंत कवि,साहित्यिक  : श्रीकांत उमरीकर 

सेलू : कवीची प्रतिभा त्याच्या साहित्यातून प्रगट होत असते. साने गुरुजी मातृऱ्हदयी होते,समाजिकतेची जाण असणारे कवि होते.”त्यांच्या कवितेतून प्रगट होणारे विचार अतिशय संवेदनशील, भावस्पर्शी व मानवास विचार करण्यास प्रवृत्त करणारे होते म्हणून साने गुरुजी प्रतिभावंत कवी होते,,असे प्रतिपादन श्रीकांत उमरीकर यांनी (दि.24 डिसेंबर) केले.

श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेत सानेगुरुजी जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता खराबे,सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत उमरीकर,पत्रकार तथा ग्राहक संरक्षण कायदा मंच चे डॉ. विलास मोरे,गंगाधर कान्हेकर,प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.दत्ता घोगरे,पर्यवेक्षक रोहिदास मोगल,सुरेखा रामदासी आदी प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमांची सुरुवात सानेगुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सौ.पूजा महाजन व संच यांनी त्यांची प्रार्थना “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थना गीताने केली.
प्रशालेच्या सौ.कीर्ती राऊत,ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदे,संस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री भालचंद्र गांजापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर आधारित “दुर्गाई” या भित्ती पत्रकाचे लिखाण श्रेया सोळंके,प्राजक्ता गाडे,साक्षी शेवाळे,शेख जोया,विद्या काष्टे या विद्यार्थिनींनी केले.त्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या प्रसंगी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पत्रकार तथा ग्राहक संरक्षण मंचे डॉ.विलास मोरे यांनी ग्राहकांनी घ्यावयाची काळजी या दृष्टीने विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
प्रशालेच्या ग्रंथालयाचा “खाऊ ऐवजी ग्रंथ भेट” या उपक्रमा अंतर्गत वाढदिवसानिमित्त
कु.शिवकन्या पतंगे – 9 वा ड या विद्यार्थिनीने प्रशालेच्या ग्रंथालयास “अग्निपंख” हा ग्रंथ भेट दिला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन तथा आभार सौ.कीर्ती राऊत हिने केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतीक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर,ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदे, सुहास देऊळगावकर,सतीश कुंडीकर, कैलास मलवडे,वैशाली चव्हाण,नेवरेकर, नागेश देशमुख,शशिकांत देशपांडे,किशोर विश्वामित्रे, सुरेखा आगळे, सिमा सुक्ते,सुषमा दामा ,रेणुका अंबेकर आदी शिक्षक शिक्षेकेत्तर कर्मचारी बंधू भगिनीने केले.


हेही वाचा : सानेगुरुजी जयंती : विद्यार्थ्यांनी सुरात गायली ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थना

हेही वाचा ; श्रीराम प्रतिष्ठान : सेलूतील सुरभि महोत्सवाचे थाटात उद्घाटन

हेही वाचा : सानेगुरूजी जयंती : रांजणीच्या सरस्वती भुवन प्रशालेत गीतगायन, कथाकथन रंगले

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!