AWARENESS : खरेदी करताना जागरूकता हवी : डाॅ विलास मोरे
सेलू येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा, नूतन महाविद्यालय, नूतन कन्या शाळेत कार्यक्रम
सेलू : ग्राहकांनी बाजारातून खरेदी करताना अधिक सजग व जागृत राहून खरेदी केलेल्या वस्तूचे पक्के देयक दुकानदारांकडून घ्यावे, तो त्यांचा अधिकार आहे. या जबाबदारीची जाणीव ठेऊन ग्राहकाने राष्ट्र निर्माणात योगदान द्यावे, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांत अध्यक्ष डाॅ विलास मोरे यांनी व्यक्त केले.
शनिवार, २४ डिसेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त सेलू येथील नूतन महाविद्यालय व नूतन कन्या प्रशालेत डाॅ विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी देवगिरी संगीत प्रतिष्ठानचे श्रीकांत उमरीकर, ग्राहक पंचायतचे सेलू तालुका उपाध्यक्ष गंगाधर कान्हेकर, पर्यवेक्षक प्रा नागेश कान्हेकर, डॉ सुषमा सोमाणी, डॉ भाग्यश्री धामणगावकर, प्रा कीर्ती डोईफोडे, डॉ राणी नाथाणी, प्रा सुश्मिता भरदम, प्रा अमृता चौंढे, प्रा गजानन देऊळगावकर, प्रा गोपाळ पिंपळगावकर, प्रा महेश कुलकर्णी, प्रा.विश्वास मुंगीकर, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता खराबे, दत्तात्रय घोगरे, रोहिदास मोगल, सुरेखा रामदासी, कीर्ती राऊत आदी उपस्थित होते. यावेळी डाॅ मोरे म्हणाले की, नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 सर्वसामान्यांच्या हिताचा आहे. प्रत्येक ग्राहकाने या कायद्याचा व्यवहारात वापर करायला हवा. यामुळे ग्राहकांचे हित अबाधित राहण्यास मदत होते. ग्राहकांनी आपली जबाबदारी ओळखून या कायद्याबाबत जनसामान्यात जनजागृती निर्माण करावी, अशी अपेक्षाही डाॅ मोरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमासाठी प्रशालेचे व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : सानेगुरुजी : जयंतीनिमित्त नूतन कन्या शाळेत कार्यक्रम
हेही वाचा : सानेगुरुजी जयंती : विद्यार्थ्यांनी सुरात गायली ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थना
हेही वाचा ; श्रीराम प्रतिष्ठान : सेलूतील सुरभि महोत्सवाचे थाटात उद्घाटन
हेही वाचा : सानेगुरूजी जयंती : रांजणीच्या सरस्वती भुवन प्रशालेत गीतगायन, कथाकथन रंगले
हेही वाचा : सानेगुरुजी जयंती : ढेंगळी पिंपळगावच्या शाळेत रंगल कथाकथन