ग्राहक जागरण : परभणी जिल्ह्यात ग्राहक जागरण पंधरवड्याचा समारोप
हसनापुर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात कार्यक्रम
परभणी : जिल्हाधिकारी कार्यालय परभणी व अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्राहक जागरण पंधरवड्याचा ३० डिसेंबर रोजी हसनापुर येथे समारोप करण्यात आला.
राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त परभणी जिल्ह्यात १५ ते ३० डिसेंबर या कालावधीत ग्राहक जागरण पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालये व ग्रामीण भागातही ग्राहक जागरण व प्रबोधनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याप्रमाणे परभणी जिल्ह्यात शासकीय कार्यालये, महाविद्यालये, ग्रामपंचायत स्तरावर ग्राहक जागरणाचे कार्यक्रम घेण्यात आले.
३० डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता परभणी तालुक्यातील हसनापुर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ग्राहक जागरण पंधरवड्याचा समारोप करण्यात आला.
यावेळी ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांत अध्यक्ष डाॅ विलास मोरे, शिक्षण समिती प्रमुख डाॅ संगीता अवचार, पर्यावरण समिती प्रमुख धाराजी भुसारे, प्रा. पडघन, प्रा. यादव, प्रा. सुरवसे, भानुदास शिंदे, मंचकराव बचाटे, गंगाधर कान्हेकर, सुनील गायकवाड, अब्दुल रहिम, योगिराज वाकुडे यांच्यासह ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कै. सौ. कमलबाई जामकर महिला महाविद्यालयायचे कर्मचारी, विद्यार्थीनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डाॅ विलास मोरे, डाॅ संगीता अवचार, गंगाधर कान्हेकर, मंचकराव बचाटे यांनी ग्राहकांचे हक्क व संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले.
हेहा वाचा : विनोद बोराडे : सिर्फ नाम ही काफी है…
हेही वाचा : शैक्षणिक सहल : विवेकानंद शाळेची क्षेत्रत्रेट; येलदरी, नेमगिरी परिसराला भेट
हेही वाचा : सुरभी महोत्सव : तरूणाईच्या जल्लोषात प्रेक्षक धुंद; सांस्कृतिक उत्सव ठरला लक्षवेधी