चित्रकला स्पर्धेत सान्वी, क्षितिजा, दुर्गा विजेत्या; सेलूतील नूतन शाळेचा उप्रकम
श्रीरामजी भांगडिया जयंतीनिमित्त आयोजन, मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
सेलू जि.परभणी : नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतर्फे कै.श्रीरामजी भांगडिया जयंती निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा, तसेच योगासन स्पर्धेतील राष्ट्रीय खेळाडू यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन बुधवारी, २९ मार्च रोजी गौरविण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक नाना काकडे, उद्योजक रामप्रसाद घोडके, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य नंदकिशोरजी बाहेती, मुख्याध्यापक एन.वाय.सोळंके, उपमुख्याध्यापक एस.व्ही.पाटील, पर्यवेक्षक डी.डी.सोनेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीरामजी भांगडिया यांच्या दूरदृष्टीमुळेच सेलू शहराचा कलेचा वारसा अधिक समृद्ध झाला, असे अशोक काकडे यांनी या वेळी नमूद केले. नंदकिशोरजी बाहेती यांनीही विजेत्यांचे अभिनंदन केले. श्रुती कुंभार, मधुश्री आष्टीकर, सृष्टी सोळंके या राष्ट्रीय योगासन स्पर्धेतील खेळाडूंनी प्रात्यक्षिक सादर केले. सूत्रसंचालन डॉ. काशिनाथ पल्लेवाड, तर आभार आर.डी.कटारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चित्रकला विभाग प्रमुख आर.डी.कटारे, कलाशिक्षक फुलसिंग गावित, शुभांगी गांजापुरकर, केशव डहाळे, अरुण रामपूरकर यांनी पुढाकार घेतला.
चित्रकला स्पर्धेतील विजेते :
गट पहिला : प्रथम : सान्वी गजानन शितळे, नूतन प्राथमिक शाळा, द्वितीय : अनुज भूषण कासट, प्रिन्स इंग्लिश स्कूल, तृतीय : मनस्वी मंगेश महाजन, नूतन प्राथमिक शाळा, गट दुसरा : प्रथम : क्षितिजा कैलास खजिने, प्रिन्स अकॅडमी, द्वितीय : पार्थ विठ्ठल चौधरी, नूतन विद्यालय, तृतीय : विराज कमलाकर कोल्हे, नूतन इंग्लिश स्कूल, गट तिसरा : प्रथम : दुर्गा अमित देवधर, नूतन इंग्लिश स्कूल, द्वितीय : स्नेहा प्रदीप मुनेश्वर, नूतन कन्या प्रशाला, तृतीय : संस्कृती राम सोळंके, ज्ञानतीर्थ विद्यालय
सेलूच्या भूमिपूत्राचा सन्मान : डॉ.संजीव देशमुख यांची शासकीय अभियांत्रिकी नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी
खासदार जाधवांना ‘वाय’ सुरक्षा द्या; शिवसेना ठाकरे गटाचे प्रशासनाला निवेदन
श्रीराम जन्मोत्सव : कीर्तनात सेलूकर दंग; गुरूवारी शोभायात्रा, पालखी सोहळा, नगरभोजन
श्रीकालिकादेवी यात्रोत्सवाला भाविकांची गर्दी, विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद