मराठा सेवा संघ अधिवेशन : देशातील इतिहासकारांनी शिवरायांचा खोटा इतिहास मांडला
प्रसिद्ध इतिहास अभ्यासक डॉ.आनंद पाटील यांचा आरोप, मराठा सेवा संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे शानदार उदघाट्न
परभणी : परकीय इतिहासकारांनीच शिवाजी महाराज यांचा उज्ज्वल इतिहास जगासमोर आणला आहे; परंतु देशातील तथाकथित इतिहासकारांनी खोटा इतिहास मांडला, असा आरोप प्रसिद्ध विचारवंत, इतिहास अभ्यासक डॉ. आनंद पाटील यांनी केला.
परभणी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी महाअधिवेशनाचे उदघाट्न डॉ.पाटील यांच्या हस्ते शनिवारी, २३ डिसेंबर रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे होते. व्यासपीठावर खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, मराठा सेवा संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, महासचिव मधुकर मेहकरे, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, उद्योजक आर. बी.घोडके, लक्ष्मणराव गोळेगावकर, दादासाहेब आदींसह पदाधिकारी, तर श्रोत्यांमध्ये मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर हे उपास्थित होते.
उपस्थित होते.
डॉ.पाटील यांनी इतिहासातील संशोधनातील बारकावे सांगत मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाचे अनेक पुरावे मांडले. देशी आणि विदेशी इतिहास संशोधकांच्या लेखनाची तुलना केली. विविध शब्दांचे अर्थ, उत्पत्ती कशी झाली, हे सांगितले. खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर इंग्रजी इतिहासकार यांना वाचले पाहिजे. तुलना केल्याशिवाय आपण वाचतोय, सांगतोय ते खरे की खोटे हे कळणार नाही आणि जगातील लेखकांची त्याबाबत काय काय मते आहेत ती कळतील, असेही ते म्हणाले. मराठा सेवा संघाने शिवाजी महाराज की जय ही घोषणा सुरू करावी. थिंक ट्यंक सुरू करावा, असे सुचविले. खासदार जाधव म्हणाले की, समाजाने एकत्र येऊन सर्वागीण विकास केला पाहिजे व यासाठी हे महाअधिवेशन फायदेशीर ठरेल. कवि इंद्रजित भालेराव यांनी मराठा सेवा संघाने माझ्यावर एक कलावंत म्हणून खूप प्रेम केले. प्रा.अर्जुन तनपुरे यांनी महाधिवेशनाची भूमिका विशद केली.
स्वागताध्यक्ष कांतराव देशमुख म्हणाले की, समाजातील विविध प्रश्न सोडवण्याचा व मानवी उन्नतीसाठी या महाधीवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष घोगरे म्हणाले की, मराठा आरक्षण देण्यासाठी सर्वच पक्ष तयार आहेत, मात्र ते न्यायालयात टिकत नाही. त्याचा अभ्यास करून आरक्षणाचा लढा पुढे घेवून जाणे गरजेचे आहे. मराठा समाजातील गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठीही पुढाकार घ्यावा लागेल. समृद्धी महामार्गामुळे अजिंठा , वेरूळ परिसरात पर्यटन उद्योगाला चालना देता येईल. मराठा सेवा संघाच्या 33 कक्षाची पुनर्बांधणी व मजबुतीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विठ्ठल भुसारे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष ढगे व उषाताई लोहट यांनी तर आभार सुधाकर गायकवाड यांनी मानले. शिवधर्म दिनदर्शिका-2023 चे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल जाधव, नरहरी वाघ, बाळासाहेब यादव,सुधाकर गायकवाड, व्यंकटराव जाधव, प्रभाकर लिखे,साहेब शिंदे, सखाराम रनेर, गजानन सोळंके, रामराव गायकवाड, रामराव बोबडे,मोतीराम चौरे,श्याम गडेकर, रवी लोहट, नीतीन लोहट,सुनिता यादव,डॉ. मीनाक्षी पाटील,सुनिता चापके,सुनिता जाधव, बालाजी मोहिते, गजानन जोगदंड यांनी परिश्रम घेतले.
स्वागताध्यक्ष कांतराव देशमुख म्हणाले की, समाजातील विविध प्रश्न सोडवण्याचा व मानवी उन्नतीसाठी या महाधीवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष घोगरे म्हणाले की, मराठा आरक्षण देण्यासाठी सर्वच पक्ष तयार आहेत, मात्र ते न्यायालयात टिकत नाही. त्याचा अभ्यास करून आरक्षणाचा लढा पुढे घेवून जाणे गरजेचे आहे. मराठा समाजातील गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठीही पुढाकार घ्यावा लागेल. समृद्धी महामार्गामुळे अजिंठा , वेरूळ परिसरात पर्यटन उद्योगाला चालना देता येईल. मराठा सेवा संघाच्या 33 कक्षाची पुनर्बांधणी व मजबुतीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
READ MORE>>>>
मराठा आरक्षण : न्यायालयात टिकणारे आरक्षण द्या : अर्जुन तनपुरे यांचे मत
NCP : जयंतराव पाटलांचे निलंबन मागे घ्या; सेलूतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी